निजामपूर येथील महिला लढविणार मालेगाव मनपा निवडणूक

0

निजामपूर। येथील सैयद शहेनाज बिलाल मुस्लीम अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम महिलेला मालेगाव महानगर पालीका निवडणुकीत प्रभाग क 14 अ मधुन उमेदवारी दिली आहे. शहेनाज ही निजामपुर गावाची रहीवासींना असुन सामान्य कुटुंबाची मुलगी आहे. प्रभाग 14 मध्ये वीस हजार मतदार आहेत. संपुर्ण अल्पसंख्याक मुस्लिम मतदार आहेत. या मतदार संघात उभी आहे सबका साथ सबका विकास या भाजपा चे धोरणाचे प्रचार व प्रसार करणार आहे.

शहनाज ही निजामपुरचे माजी उपसरपंच ताहीरबेगमिरजा यांची बहिण आहे. तरी निजामपुर भागात कौतुक होत आहे. अल्पसंख्यांक समाजात मुलगी चुल आणि मुल पर्यन्त सिमीत असतांना शहेनाजबी मालेगांव सारख्या मोठ्या महानगर पालीकेत आपले नशिब आजमावत आहे. त्या मुळे सर्वत्र शहेनाजबीचे कौतुक होत आहे.