निजामपूर येथे ज्येष्ठ नागरिक संघाची सभा

0

निजामपुर । साक्री तालुक्यातील निजामपुर येथे जेष्ठ नागरीकाची सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी भदाणे होते. भदाणे यांनी मार्गदर्शन करतांना सागितले की, शासनाकडून एक हजार रुपयाची पेंशनसाठी नंतरचे अवघड जीवन जगणार्‍या जेष्ठ नागरिकांना मिळावी यासाठी शासन दरबारी जेष्ठ नागरिक संघाचे प्रयत्न असुन वृद्धापकाळ पेंशन योजनेंसह इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना मागण्यांचे निवेदन देवून सविस्तर चर्चा करणयात येणार असल्याचे खान्देश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भदाणे यांनी निजामपुर लाडशाखीय वाणी मंगल कार्यालाय येथे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सचिव एस. पी. पवार, धुळयाचे एन. पी. वाणी, बारामती महीला जेष्ठ संघाच्या अध्यक्षा डॉ. सुलभा कूवर, हाजी नुरानी, डी. एन. पाटील, पंडीत बदामे आदी हजर होते. यावेळी निजामपुरचे जेष्ठ नागरिक धोंडू सोनु राणे, माधव चिचोले, डी.एन. पाटी, हाजी नुरानी, पंडीत बदामे यांचा जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने सत्कार करणयात आला. निजामपुर माळमाथा परिसरात जेष्ठ नागरिक संघाच्या 13 शाखा सथापना करण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. रमाकांत शिरोडे यांचे मोठे योगदान आहे. सुत्रसंचालन माधवराव बोरसे यांनी तर आभार मधुकर बधान यांनी मानले.