नवी दिल्ली-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमध्ये जेडीयू आणि राजद यांनी युती करत सत्ता स्थापन केली मात्र त्यानंतर नितीश कुमार यांनी राजदशी फारकत घेत भाजपशी हात मिळवणी केली. तेंव्हा पासून नितीश कुमार यांचे भाजपशी जवळीक वाढली आहे.