नवी दिल्ली-बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत नितूने सलग दुसऱ्या वर्षात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ किलो वजनी गटात नितूने थायलंडच्या निलादा मेकॉनचा पराभव केला. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेतही नितूने सुवर्णपदक ठरले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला नितू थोडीशी गोंधळलेली पहायला मिळाली होती. मात्र वेळेतच नितूने स्वतःला सावरत सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. या आक्रमक खेळामुळे पंचांनी विजेतेपदाचं माप नितूच्या पदरात टाकले. मागच्या वर्षी गुवाहटीत झालेल्या स्पर्धेत भारतीय महिलांनी ७ पदकं कमावली होती. नितू व्यतिरीक्त भारताच्या मनिषा, अनामिका आणि साक्षी या खेळाडूही पदकांच्या शर्यतीमध्ये आहेत, त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.