कणकवली: भाजपात प्रवेश करून कणकवलीतून भाजपकडून निवडणूक लढणारे आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेतली. नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण भाषणात कॉंग्रेस-राष्ट्रवादीवरच टीका केली. त्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार आहे की सेनेचा असा प्रश्न उपस्थितांना पडला.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात प्रवेश केला.