दोंडाईचा। शिंदखेडा शहरातील मुख्य स्टेशन रोडच्या काँक्रीटीकरणासाठी पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी निधी मंजूर करून आणला होता परंतु ठेकेदाराकडून नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे पाहून ना. जयकुमार रावल यांनी या कामाची तक्रार अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली त्यानुसार या कामाची कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत चौकशी सुरू झाली असून लवकरच क्वालिटी कॅट्रोंल पथक देखील या कामाची गुणवत्ता तपासणी साठी शिंदखेडा शहरात दाखल होणार आहे
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणार?
शिंदखेडा येथील मुख्य स्टेशन रस्त्याच्या कामासाठी ना. रावल यांनी विशेष बाब म्हणून निधी आणला होता ठेकेदाराने काम नित्कृष्ठ दर्जाचे सुरू केले त्यामुळे ना रावल यांनी अनेकदा उपअभियंता यांना सूचना दिल्या परंतु काम तसेच सुरू राहिल्याने अखेर रावल यांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे कामाची तक्रार केली त्यामुळे बांधकाम विभाग जागा झाला कार्यकारी अभियंता श्री भोसले यांनी या कामाची चौकशी सुरू केली आहे, लवकरच नाशिकचे क्वालिटी कॅट्रोलचे पथकदेखील या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाईदेखील करु शकते. याबाबत ना. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात कोणत्याही ठेकेदाराचेे नित्कृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही आम्ही शासनाकडून मेहनतीने निधी मंजूर करून आणतो आणि ठेकेदार आपले हित साधण्यासाठी दर्जेदार कामे करीत नसतील तर यापुढे अधिकार्यांना निलंबित करण्याची कारवाईदेखील केली जाईल असा इशारा देखील ना जयकुमार रावल यांनी दिला आहे