निद्रा आणि निद्रानाशाने मुदतपूर्व बाळंतपण

0

अमेरिकन स्लीप असोसिएशनने झोपेचे तीन टप्प्यात वर्गीकरण केले आहे. टप्पा एक, दोन आणि रेम. पहिल्या टप्प्यापासून एकदम शांत झोप असलेला टप्पा रेम गाठण्यासाठी थोडा वेळ लागतो. सात तासाची झोप उत्तम असते ती या तीन टप्प्यांचीच बनलेली असते. जे लोक कमी झोपतात ते सर्वच टप्प्यांमधली झोप घेत नाहीत. झोप कमी असल्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळतेच पण आकलन क्षमताही कमी होते.

नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध झाले त्यात कमी झोप असेल तर मुदतपूर्व बाळंतपणाची शक्यता असते असे सांगितले आहे. अमेरिकेत ३० लाख महिलांचा अभ्यास करून हे संशोधन करण्यात आले आहे. गरोदर महिलांना चांगली झोप नसेल तर बाळंतपण अलिकडे येते असे संशोधकांना आढळले आहे. होणाऱ्या बाळालाही आईच्या कमी झोपेचा फटका बसतो.

झोप नीट लागण्यासाठी काय कराल…..
झोप येत नसेल तर झोपेची जागा बदला. खोलीत खेळती हवा राहिल असे पहा. जास्त प्रकाश नसेल असे पहा. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा किंवा गरम पाण्याने आंघोळ करा. त्याने चांगली झोप येते.

आहार कसा असावा….
पचेल असेच अन्न खा. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेऊन घ्या.
अतितिखट आणि तेलकट खाऊ नका.
कॅफिन पोटात किती जाते त्यावर नियंत्रण ठेवा आणि झोपण्यापूर्वी कॅफिन घेऊ नका.
अतिसाखरेचे सेवन टाळा
चेरी, केळी, भात, दूध झोपेसाठी उत्तम
मद्य, प्रक्रीया केलेले अन्न, मांस, चमचमीत पदार्थ रात्री टाळा
अश्वगंधा पावडरची टी बॅग आणि कॅप्सुल वापरा.