यावल– तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या २१ लाख २५ हजार पन्नास रुपयांच्या अपहार करून शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघाविरूध्द येथील विस्तार अधिकारी(ग्रा. पं.) एस. टी. मोरे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. टी. मोरे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायतीस प्राप्त १४ व्या वित्त आयोगा मधील २१ लाख तीन हजार ८२३ रुपये व व्याज २२ हजार ७४१ असे २१ लाख २६ हजार ६५४ पैकी १९ लाख २५ हजार ५० रुपयाचा खर्च सरपंच ज्योती अशोक महाजन व तत्कालीन ग्रामसेवक भास्कर रोकडे यांनी वेळोवेळी केला असून झालेल्या खर्चाच्या नोंदि किर्दबुकास घेतल्या असून वस्तुच्या साठा रजीस्टर व डेड स्टॉक रजीस्टरला नोंदि नाहीत. त्यामुळे खरेदी केलेल्या वस्तु वापर कोणत्या ठिकाणी केला याची पडताळणी करता आली नसुन केलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक व रकमेचे मुल्यंकन तपासणीत आढळून आले नसल्याने शासनाने नेमून दिलेल्या कामावर सदरची रक्कम खर्च न करता स्वत:च्या फायद्यासाठी निधीचा वापर केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पो. नि. डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक अहीरे, कॉ. संजय तायडे, संजीव चौधरी पुढील तपास करीत आहेत.