फैजपूर– निपक्ष निवडणूक लोकशाहीचा आत्मा आहे. लोकांनी पैसा, जात, धर्म, पंथ या आधारावर भेदभाव न करता लोकप्रतिनिधींना निवडले पाहिर्जेें असे प्रतिपादन प्रा.डॉ.शुभांगी डी.राठी यांनी येथे केले. तापी परीसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप, प्रा.डॉ.ए.आय.भंगाळे प्रा.ताराचंद सावसाकडे, प्रा.हितेंद्र पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डॉ.ए.आय.भंगाळे यांनी केले. उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप यांनी लोकांनी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या लोकप्रतिनिधी कडून चालविलेली शासन पध्दती म्हणजे लोकशाही होय व या लोकशाही ला मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तरुणांचा निवडणुकीसाठी होतोय वापर
पूर्वी लोकांच्या सहभागातून निवडणूक लढविली जात असायची, निवडणुकीसाठी कार्यकर्ते स्वतः हुन लोकप्रनिधींचा प्रचार करीत होते. त्या निवडणुकीच्या प्रचार तंत्रात आज मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आज गावा-गावातील रिकाम्या तरुणांचा निवडनूकीत वापर करून घेतला जात आहे. त्यामुळे स्वातंत्र, समता, अभिव्यक्ती विचार या गोष्टीचा लोप होतांना दिसून येत असल्याचे मत प्राचार्य डॉ.पी. आर. चौधरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, हे चित्र जर बदलावयाचे असेल तर तरुणांनी पुढे येवून समाजात परीवर्तन व लोकशाहीसाठी कार्य करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार प्रा. ताराचंद सावसाकडे यांनी मानले. प्रा.हितेंद्र पाटील ,विजय कोळी वैभव तायडे, धनंजय सपकाळे या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.