दोन लाख ४७ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त
नगरदेवळा । येथून जवळ असलेल्या निपाणे गावात ठिकठिकाणी सुरू असलेले दारू गाळप व गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यावर अचानकपणे बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात पोलिसांनी धाडसत्रात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारून जप्त करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, जीजाबराव पवार, महिला पोलिस शारदा भावसान, पो.हे.कॉ. प्रदिप चांदलेकर, पो.ना. अनमोल पटेल, राजेश पाटील, नरेंद्र शिंदे, राहुल बेहरे, पो.कॉ. गजानन काळे, संभाजी पाटील यांच्यासह इतर कर्मचार्यांनी निपाणे गावात ठिकठिकाणी गावठी हातभट्टी दारूची महिती काढून अचानकपणे धाड टाकली असता दोन लाख ४७ हजार ७०० रूपयांचे ११ हजार ४५० लिटर कच्चे रसायन, गुळमिश्रित रसायन व १५६ लिटर लहान भट्टीची दारू जप्त करून अशाबाई दिलीप भिल, राजेंद्र देवराम भिल, युवराज श्रीवण भील, मधुकर गुलाब भील, कमलाबाई केशरमल भील व सुमनबाई परमेश्वर भील सर्व राहणार निपाणे ता. पाचोरा यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आली.