जळगाव। नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ ऑटिस्टस् अॅण्ड अॅक्टिव्हिस्टस् (निफा) च्या जिल्हाध्यक्षपदी अमित संजय जगताप व सचिवपदी विराज अशोक कावडीया यांची निवड करण्यात आली. अमित जगताप हे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तसेच विराज कावडीया हे जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालय येथे एलएलबीचे शिक्षण घेत आहेत. निफा ही संस्था राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून सहा वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. संस्थेची स्थापना सन 2000 मध्ये झाली होती. संस्थेचे अध्यक्ष प्रितपालसिंग पन्नू आहेत.
देशभरातुन दहा हजार युवक घेणार सहभाग
संस्थेचे मुख्य कार्यालय करनाल, हरियाणा येथे असून भारत सरकार, एम्बसी ऑफ जापान, कला व सांस्कृतिक मंत्रालय मॉरेशिस नेहरू युवा केंद्र, युवा क्रीडा मंत्रालय हरीयाणा इत्यादींशी संलग्नित आहे. देशाच्या विविध राज्यात संस्थेच्या शाखा आहेत. निफा अंतर्गत ऑक्टोबर 2017 मध्ये हरीयाणा येथे हार्मनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशविदेशातून दहा हजार युवक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात कृषी, फाईन आर्टस्, युवा विचार, राष्ट्रीय एकता दिंडी, तारे जमिन पर (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी), आंतरराष्ट्रीय युवा संमेलन, आतंकवाद, अमली पदार्थ विरोधी संमेलन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. निवडीची घोषणा निफा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भरत जेठवाणी यांनी केली आहे.