पुणे : भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘ आयएमईडी’) आयोजित निमंत्रितांच्या आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल टूर्नामेंटचे उदघाटन १० जानेवारी रोजी सकाळी ‘आयएमईडी’ पौड रस्ता कॅम्पस येथे झाले. भारती विद्यापीठ संस्थापक डॉ पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त ही टूर्नामेंट आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. डॉ. सचिन वेर्णेकर (संचालक ,आयएमइडी ),महेश धस (आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू),डॉ नेताजी जाधव(क्रीडा विभाग प्रमुख ,भारती विद्यापीठ ) हे उपस्थित होते.