बोदवड- तालुक्यातील निमखेडी येथील 13 वर्षीय बालिकेचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दीपमाला कैलास पाटील (13) असे मयत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातून शून्य क्रमांकाने बोदवड पोलिसात नोंद वर्ग करण्यात आली. दीपमाला पाटील हिला 20 रोजी दुपारी 12.20 वाजता बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी व्हिसेरा प्रीझर्व्ह ठेवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक विजेश पाटील करीत आहेत.