निमखेडीत अनुपम सोसायटीमधील बंद घरातून 35 हजारांचा मुद्देमाल लांबवला

A locked house was broken into in Nimkhedi : 35,000 worth of property was recovered जळगाव : जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवरातील अनुपम सोसायटीमधील बंद घरातून रोकडसह दागिणे मिळून 35 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. हा प्रकार बुधवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता समोर आली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

35 हजारांच्या ऐवजावर डल्ला
जळगाव शहरातील निमखेडी शिवारात अनुपम सोसायटीत गणेश अशोक पाटील (45) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी नगरदेवळा जवळ असलेल्या होळ येथे गेले असता 11 डिसेंबरपासून घर बंद होते. चोरट्यांनी संधी साधत नऊ हजार रुपये किंमतीचे 6 ग्रॅमचे कानातले, चार हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिणे व 22 हजार रुपये रोख असा एकूण 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविला. गणेश पाटील यांचे मित्र घर पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला व त्यांनी याबाबतची माहिती घर मालकाला कळवली. गणेश पाटील यांनी याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहेत.