Burglary in Hiragouri Park : One And A Half Lakhs In Compensation जळगाव : निमखेडी शिवारातील हिरागौरी पार्क येथील अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चोरट्यांनी एक लाख 44 हजार रूपये किंमतीचे दागिने लांबवले. बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
विमा प्रतिनिधी गोविंदा हिलाल पाटील (41, हिरागौरी पार्क, निमखेडी शिवार, जळगाव) हे मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेच्या दरम्यान ते घर बंद करून बाहेर गेले असता चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लाख 44 हजार रूपये किंमतीचे दागिने लांबवले. गोविंदा पाटील हे रात्री आठ वाजता घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.