निमगावच्या सरपंच उज्ज्वला पाटील यांचा गौरव

0

जळगाव। निमगाव येथील सरपंच उज्ज्वला पाटील यांचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावल तालुक्यातील निमगाव येथील नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला प्रदिपसिंह पाटील यांनी आज रूग्णालयात माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सरपंच उज्वला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उज्ज्वला पाटील ह्या पहील्याच प्रयत्नात निवडुन येऊन सरपंच झाल्या आहेत. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

प्रदिपसिंह पाटील यांचे आजोबा प्रल्हाद ओंकार पाटील हे 50 वर्ष या गावचे सरपंच राहीले आहेत. निमगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच प्रमोद तावडे, कविता तावडे, निशा तावडे, रूपाली चौधरी, दिलीप पाटील, प्रविण पाटील, सुनिल कोळी, सुभाष कोळी, साहेबराव सोनवणे हे सदस्य म्हणुन कार्यरत आहे. उज्ज्वला पाटील यांच्या निवडीसाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी आमदार रमेश चौधरी, गिरधर पाटील, लिलाधर चौधरी, उमाकांत पाटील, यांनी सहकार्य केले.