अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय ; गावात आरोग्य विभागाचा सर्वे
यावल- एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना अतिसाराची लागण झाल्याची घटना निमगावात घटल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर रुग्णांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेे. निमगावात साकळी आरोग्य केंद्राचेे पथक पाठवुन गावात सर्वे करण्यात आला. निमगाव येथील संगीता समाधान कोळी (40), वच्छलाबाई कैलास कोळी (36), गयाबाई मुरलीधर कोळी (48), नंदाबाई जयराम कोळी (45), बेबीबाई सुभाष कोळी (50) व चिंधाबाई रामचंद्र कोळी (45) या एकाच कुटुंबातील सहा जणांना गुरुवारी सकाळी जुलाब व उलट्याच्या त्रास झाल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ.परवीन तडवी, शितल ठोंबरे, संजय जेधे यांनी तातडीचेे उपचार सुरू केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे यांनी रुग्णांची भेट घेतली. अन्नातुन विषबाधा होत अतिसारची लागण या एकाच कुटुंबातील सर्वांना झाली असावी, असा अंदाज आरोेग्य विभागाकडून वर्तवला जात आहे.