निमित्त हल्लाबोल आंदोलनाचे, तयारी विधानसभा निवडणुकीची

0

मेदवारीसाठी जोरदार होणार शक्तिप्रदर्शन

पिंपरी-चिंचवड : विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणार्‍या शहराय राष्ट्रवादीची विधानसभेत तरी परिस्थिती सुधारणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. खासकरून चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणाला उतरवणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच दोन दिवसीय राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन होत आहे. निमित्त आंदोलनाचे असले तरी ही तयारी आगामी विधानसभेची आहे, अशी चर्चा आहे.

आज भोसरीत, उद्यात काळेवाडीत तोफा
राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा पश्‍चिम महाराष्ट्रात अशून आजपासून कोल्हापूरात या आंदोलनास सुरुवात झाली. या आंदोलनांतर्गत दि. 10 एप्रिल रोजी गावजत्रा मैदान भोसरी व दि. 11 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता चिंचवड मतदार संघात काळेवाडीतील एम.एम. शाळेसमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार आहे. त्याची तयारी नगरसेवक नाना काटें यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.

चिंचवडमध्ये उमेदवारीसाठी शोध मोहिम
चिंचवड विधानसभा मतदारसंघ आमदार लक्ष्मण जगताप यांचा. मात्र, आता भाजपाचा बालेकिल्ला झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडे तेवढा सक्षम उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे चिंचवडच्या उमेदवारीचे मोठे आव्हान असणार आहे. जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून जी नावे पुढे येतात त्यात काही नावे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेता धनजंय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकारविरोधात रान उठविले आहे. त्याचाच फायदा काही जण घेण्याच्या तयारीत आहेत. चिंचवडमध्ये आंदोलनाच्या माध्यमांतून नेते ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या शक्तीप्रदर्शनावर विधानसभेच्या निवडणुकीचे भवितव्य अवंलबून आहे.