इचखेडा शिवारातील दुर्दैवी घटना : किनगावात हळहळ
यावल- ट्रॅक्टरद्वारे शेतात मशागतीचे काम सुरू असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याने किनगावच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता तालुक्यातील इचखेडा शिवारात घडली प्रमोद देवराम तायडे (38, रा.किनगाव खुर्द) असे मयत चालकाचे नाव आहे. किनगाव खुर्द येेथील रहिवासी कांदा व्यापारी तसेच भाडे तत्वावर शेत मशागत करून देण्याचे व्यवसाय करणारे प्रमोद तायडे सोमवारी किनगावपासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या इचखेडा शिवारातील एका शेतात करीत होते. ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19-4719) व्दारे ते रोटर करीत असताना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या शेतातील विहिरीजवळ अचानक ट्रॅक्टर कलंडले. या अपघातात प्रमोद तायडे हे ट्रॅक्टरखाली दाबले जागीच मृत झाले. या घटनेची माहिती गावात मिळाल्यावर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेेह ट्रॅक्टरखालून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता आणला. प्रमोद तायडे यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.