Out of control, Eicher crashed into a hot water tank near Savalde : driver drowned, cleaner survived शिरपूर : भरधाव आयशर वाहन नियंत्रण सुटल्याने तापी नदीपात्रात कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदेलगत घडली. आयशरमधून सहचालक दिलीप जयसिंग ब्राहणे (रा.देवळा, ब्राह्मण्यपूर फल्या, ता.राजपूर, जि.बडवाणी) सतर्कतेने बचावला तर चालक धर्मेंद्र मोहन डावर (रा.सांगवी निमा, ताराजपूर, जि.बडवाणी) हा वाहनासह पाण्यात बुडाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत चालकाचा शोध सुरूच होता.
इंदौरकडे निघालेले वाहन कोसळले
आयशर चालक धर्मेंद्र डावर हा बुधवारी सायंकाळी आयशर (सी.जे. 07 सीफजी.8970) क्रमांकाच्या वाहनात गुलाबजामुन तयार करण्याचे पावडर घेऊन पुण्याहून इंदौरकडे निघाला होता. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावर वाहन आल्यानंतर ताबा सुटल्याने आयशर नदी पात्रात कोसळली मात्र वाहन नदी पत्रात कोसळत असतांना काचा फुटल्याने सुदैवाने सहचालक बाहेर फेकला गेल्याने नदीपात्रात मासेमारी करणार्या मच्छीमारांनी त्यास बाहेर काढले मात्र दुर्दैवाने चालक धर्मेद्र डावर वाहनाच्या कॅबीनमध्ये अडकल्याने तो नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाहन बुडाले नदीपात्रात
वाहनाच्या प्रचंड वेगामुळे वाहनाने पुलाचे 70 ते 80 फूट कठडे तोडत नदी पात्रात गाठले. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर, शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, नरडाणा पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे, महामार्ग पोलीस, टोलवेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.