नियंत्रण सुटलेल्या आयशरच्या धडकेने चिखलीतील तरुणाचा मृत्यू
चिखली गावात शोककळा : श्री विसर्जनादरम्यान कंड पुलावर घडला अपघात : अज्ञात आयशर चालकाविरोधात गुन्हा
A Ganesha devotee in Chikhli died after being hit by an Eicher मुक्ताईनगर : भरधाव आशयरने ट्रॅक्टरला धडक दिल्याने चिखली येथील 25 वर्षीय गणेशभक्ताचा मृत्यू झाला. हा अपघात घोडसगाव शिवारातील कंड पुलावर शनिवार, 10 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडला. अपघात प्रकरणी अज्ञात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात आयशर चालकाविरोधात गुन्हा
विकास विठ्ठल कांडेलकर (कोळी, 30 रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री 10 वाजता घोडसगाव शिवारातील कंड पुलावर श्री विसर्जनादरम्यान गणपतीची आरती सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात आयशरने ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.पी.9146) ला धडक दिल्याने भागवत उर्फ शंकर कांडेलकर (25, कोळी, रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टरचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला. तपास एएसआय संजीव पाटील करीत आहेत.