धरणगाव : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून झालेल्या अपघातात कार चालक तरुणाचा मृत्यू झाला तर चौघे जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी घडला. भैय्या मधुकर बारी (24, रा.शेंदुर्णी, ता. जामनेर) असे मयत चालकाचे नाव आहे.
नियंत्रण सुटल्याने उलटली चारचाकी
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी पाच तरुण चारचाकी (एम.एच.12 एफ.वाय. 0988) ने धरणगावकडून चोपडा शहराकडे जात असताना चालक भैय्या मधूकर बारी (24, रा.शेंदुर्णी, ता.जामनेर) याचा कारवरील ताबा सुटल्याने कार धरणगाव तालुक्यातील नांदेड-रोटवद दरम्यानच्या रस्त्यावर उलटली. या अपघात कार चालक जखमी झाला तर अन्य चौघे जखमी झाले. मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.