विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन कार्यक्रमाचे आयोजन
जामनेर – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय मान्यता प्राप्त परिसंस्था यांच्याकडून शैक्षणिक वर्षे २०१८-१९ मध्ये प्रकाशित केलेले नियतकालिक अंक स्पर्धेत ४८ महाविद्यालय सहभागी झाले होते.यामध्ये मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील राज्यशास्र विभागाचा विद्यार्थी रुपेश राजाराम बिऱ्हाङे यास मराठी संशोधन लेखनास प्रथम पुरस्कार जाहीर झाला.ग्रामविकासातून राष्ट्रविकासाकङे हा लेखानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.शिरीष पाटील, प्रा.विजय लोहार, प्रा.शशिकांत हिंगोणेकर, प्रा.जयेश पाङवी, प्रा.राजीव पवार, प्रा.हर्षल पाटील, नगरसेवक अतिष झाल्टे, रविंद्र झाल्टे, विजय सुर्यवंशी, अश्विन पाटील, विनोद पाटील, वर्षा उपाध्ये, नेहा पाटील व मित्र परिवारानी रुपेशचे अभिनंदन केले.