नियमबाह्य समित्यांच्या सभापती नियुक्तीबाबत सुनावणी

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत जि.प. उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापतीची निवड नियमबाह्य केल्याप्रकरणी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या दालनात 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.जि.प.जळगावच्या 18 एप्रिल रोजीच्या विशेष सभेत उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांना देण्यात आलेल्या विषय समित्यांच्या प्रभारासंदर्भांत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 83 नुसार निवड करणे आवश्यक असतांना त्यात नियमबाह्य निवड केल्या प्रकरणी दि. 17 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्या दालनात सुनावणी होणार असून गैरहजर राहिल्यास संबंधिताचे काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे कळविले आहे.