जळगाव। शहर वाहतुक शाखेतर्फे आवश्यक कागपत्रे पूर्ण असलेल्या 160 परवानाधारक रिक्षांना विशेष स्टिकर्स लावण्यात आले आहे. यात परवानाधारक रिक्षांची कागपत्र तपासून त्यांची शहर वाहतुक शाखेत नोंद घेण्यात आली. 4 मार्च रोजी घेण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात पोलिस अधीक्षकांनी केलेल्या सुचनानुसार ही मोहिम राबविण्यात येत आहे.
यातच परिपूर्ण कागपत्र असलेल्या रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षांची कागपत्रांची तपासणी वाहतुक पोलिसाकडून करून घेत आहेत. अशा एकूण परिपूर्ण कागपत्र असलेल्या नियमात चालणार्या 160 रिक्षांची नोंद झाली असून या रिक्षांना विशेष स्टिकर्ष लावण्यात आले आहे. या स्टिकर्समुळे ज्या रिक्षांची कागपत्रे पुर्ण नाहीत अशांवर कारवाई करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. यातच 20 मार्चनंतर गणवेश परिधान न करणार्या, पुर्ण कागपत्रे नसणार्या रिक्षावाहनधारकांवर तपासणी माहिम राबविण्यात येवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानाधारक रिक्षाचालकांनी कागपत्रे तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.