‘स्टेट्स’मध्ये बदल : ‘व्हॉट्सअॅप’मध्ये झालेला सर्वात लक्षणीय बदल म्हणजे ‘स्टेटस’. त्याआधीपर्यंत ‘व्हॉट्सअॅप’चे ‘स्टेटस मेसेज’ हे केवळ मजकुरांपुरते मर्यादित असायचे. परंतुआता छायाचित्रे, जिफ फाइल, व्हिडीओ यापैकी काहीही ‘स्टेटस’ म्हणून ठेवता येते. एकावेळी अनेक फोटो निवडून त्यांचा ‘स्लाइड शो’ देखील स्टेटस म्हणून ठेवता येतो. हा ‘स्टेटस संदेश’ 24 तासांपुरता असतो. त्यानंतर तो आपोआप गायब होतो. मग तुम्ही पुन्हा नवीन स्टेटस ठेवू शकता. या बदलाला वापरकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
फोटो बंडलिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग : आतापर्यंत वापरकर्त्यांनी एकाच वेळी अनेक फोटो पाठवले तरीही हे सगळे फोटो एक एक करूनच पाहावे लागत होते. मात्र, आयफोनवर नव्याने सुरू झालेल्या सुविधेनुसार तुम्ही काही फोटोंचा एकत्रित आल्बम तयार करून आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. त्यामुळे समोरची व्यक्ती जेव्हा ही फाइल ओपन करेल, तेव्हा त्याला सर्व फोटो एकाच पानावर पाहायला मिळतील.
चुकून पाठवलेला मेसेज रद्द : हा अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. मात्र अद्याप तो सर्वच स्मार्टफोनवर उपलब्ध झालेला नाही. या सुविधेमुळे चुकून पाठवण्यात आलेला एखादा मेसेज रद्द करता येतो. अर्थात तो मेसेज ‘अनसेंड’ असेल किंवा अपलोड झाला नसेल तोपर्यंतच तुम्ही तो ‘रिकॉल’ किंवा रद्द करू शकता.
‘टू स्टेप्स व्हेरिफिकेशन’ : या वर्षी फेब्रुवारीमध्ये उपलब्ध झालेली ही सुविधा आताशी वापरकर्त्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. या सुविधेनुसार वापरकर्त्याला आपल्या ‘व्हॉट्सअॅप’च्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अकाउंट’मधील ‘टू स्टेप्स व्हेरिफिकेशन’चा पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर या ठिकाणी एक 6 अंकी कोड नोंदवावा लागतो. हा कोड एकदा निश्चित झाल्यानंतर आपण निर्धास्त होऊ शकतो. कारण त्यामुळे व्हॉट्सअॅप ‘हॅक’ करणे कुणालाही सहजासहजी शक्य होणार नाही.
व्हिडिओ : एखादा व्हिडीओ डाउनलोड होता होताच पाहता येऊ शकतो. ही सेवा जवळपास सर्वच प्रकारच्या मोबाइलवर उपलब्ध आहे.
जुनी ‘स्टेटस’ कायम : ‘स्टेटस’च्या रचनेत मोठा बदल केल्यानंतर पूर्वीची मजकुरापुरती मर्यादित आणि ‘डीपी’सोबत दिसणारी ‘स्टेटस’ची पद्धत व्हॉट्सअॅपने बंद केली होती. मात्र वापरकर्त्यांकडून त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर नव्या स्टेटससोबत जुनी स्टेटसही कायम ठेवण्यात आली आहेत.
एकावेळी जास्त ‘शेअरिंग’ : पूर्वी ‘व्हॉट्सअॅप’वरून एकाच वेळी जास्तीतजास्त दहा फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता येत होते. परंतु, समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरापुढे ही संख्या अपुरी पडू लागल्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीपासूनच एकाच वेळी जास्तीत जास्त 30 फाइल्स शेअर करण्याची सुविधा ‘व्हॉट्सअॅप’ने दिली.
‘नाइट मोड’ : आयफोनवर अलीकडेच व्हॉट्सअॅपने ‘नाइट मोड’ची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे अंधारात एखादे छायाचित्र काढताना कॅमेरा आपोआप प्रकाशात सुधारणा करतो.
फाइल ट्रान्स्फर : व्हॉट्सअॅपवरून आतापर्यंत फोटो किंवा व्हिडीओ शेअर करता येत होते. त्यानंतर आता डॉक्युमेंट’ फाइल आणि ‘जिफ’ फाइल पाठवण्याची सुविधाही आली. आता ‘एमपी3’, ‘एपीके’ अशा फाइलही पाठवता येतात. अॅण्ड्रॉइडवरून अशा 100 एमबीपर्यंतच्या तर आयफोनवरून 128 एमबीपर्यंतच्या फाइल पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
29 जुलैला व्हॉट्सअॅप बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्हॉट्सअॅप ही लोकप्रिय सोशल साईट देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची बाब पुढे आली आहे. काही अपप्रवृत्ती या अॅपचा गैरवापर करत आहेत. एवढेच नाही तर देशाच्या एकात्मतेला आणि सुरक्षेला सुरुंग लावणारे आतंकवादीही त्यांचे नेटकर्व मजबूत करण्यासाठी या ‘अॅप’चा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे व्हॉट्सअॅपवर बंदीची शक्यता नेटीझन्स विश्वात
व्यक्त केली जात आहे.
सुनील आढाव – 7767012211