जळगाव । शासनाने कर्जमाफी जाहीर केली. मार्च 2016 पर्रत थकीत शेतकर्रांना शासनाने दिड लाखापर्रंत कर्जमाफी दिली. तर ज्या शेतकऱ्यांनी निरमीत कर्जभरणा केला अशा शेतकऱ्यांना केवळ 25 हजाराचे अनुदान देण्याचे जाहीर केले असे करुन शासनाने थकीत शेतकरी व निरमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केला असून निरमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली. बँकेने शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवून निरमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. रावर माजी महसूलमंत्री तथा जिल्हा बँकेचे संचालक आमदार एकनाथराव खडसे रांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविले जाईल तसेच थकीत व निरमित कर्जदारांना समान न्याय देण्यात या, वाअसा ठराव मंजूर करण्यात येऊन शासनाला पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच निरमित शेतकऱ्यांना दंड व्याज माफ करण्यात येईल असे जाहीर केले. जिल्हा बँकेची 101 वी वार्षीक सर्वसाधारण सभा शुक्रवारी 22 रोजी पार पडली रावेळी शेतकऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
नोटाबंदी आणि कर्जमाफीचा फटका
8 नोव्हेबर 2016 रोजी केंद्र शासनाने पाचशे व एक हजारच्या चलनातील नोटा रद्द केल्याने रद्द झालेल्या 210 कोटी रुपये बँकेकडे 9 महिने पडून राहिल्याने रापोटी बँकेला व्याज भरावे लागले. तसेच शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणामुळे बँकेच्या कर्जवसुलीवर विपरीत परिणाम होवून कर्जवसुली कमी झाली आहे. त्यामुळे कर्ज वसुली कमी होवून बँकेला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले असे अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर रांनी रावेळी सांगितले.
बँकेला 23 कोटीचा नफा
बँकेच्या सर्व संचालकांच्या परिश्रमातून 23 कोटी रुपयांचा नफा बँकेला मिळाला आहे. नोटबंदीच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र धिर न सोडता सर्व संचालकांनी अथक मेहनतीने बँकेच्या कारभारत हातभार लावला. 100 टक्के सर्वशाखा ऑनलाईन करण्यात आल्या आहे. यामुळे नाबार्डने बँकेला 5 कोटीचे अनुदान दिले आहे. चौकटीच्या बाहेर व्यवहार करु नका, अनेकांकडून चांगले पहावत नाही, अशी बोचरी टिका आमदार खडसे यांनी यावेळी विरोधकांवर केली. बँकेचा कारभार पारदर्शक असल्याने येत्या दोन वर्षात शुन्य एनपीए होईल असा विश्वासही त्रांनी रावेळी व्रक्त केला.
विम्याचे लाभ त्वरीत मिळतील
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेला पिक वारा जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते मात्र यावर उपाय म्हणून पिक विमा संरक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक पिकांवर वेगवेगळे पिक संरक्षण मिळत आहे. यापूर्वी 50 टक्के नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत होती, मात्र आता 10 टक्के जरी नुकसान भरपाई झाली तरी शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचे लाभ त्वरीत मिळेल. नुकसान झाल्यास एसएमएसद्वारे अथवा प्रत्रक्ष भेटून बँकेला कळविल्यानंतर दोन दिवसात पंचनामा करुन लाभ मिळवून देण्यात येईल असे बँकेच्या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले.
रांची होती उपस्थिती
या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रोहीणीताई खडसे-खेवलकर ह्या होत्या. यावेळी उपाध्यक्ष किशोर पाटील, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, खासदार ए.टी.पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, संचालक नंदकिशोर महाजन, डॉ. सुरेश पाटील, वाडीलाल राठोड, प्रदीप देशमुख, नानासाहेब देशमुख, अमोल पाटील, तिलोतमा पाटील, गणेश नेहते, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.