उर्जा मंत्री नितीन राऊत : चिंचाटी-सावखेडा येथे 33/11 केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन
सावदा : नियमित वेळेवर वीज बिल भरून सहकार्य केल्यास एक टक्के सुट मिळू शकेल, असे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केले. चिंचाटी-सावखेडा येथे 33/11 केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कृषी धोरणाचा शेतकर्यांना लाभ
उर्जा मंत्री म्हणाले की, मी कृषी धोरण आणले आहे. या कृषी धोरणांतर्गत फार मोठे काम आपल्या राज्यात होऊ शकतो कारण 50 टक्के शेतकर्यांना थेट त्यांच्या बिलामध्ये माफी देतो आणि जेव्हा ते बिल भरायला जातात तेव्हा त्यांचा विलंब आकार सुद्धा आम्ही माफ करतो आणि तुम्ही भरलेल्या रकमेतील 30 टक्के रक्कम तुमच्या ग्रामपंचायतीच्या भागात खर्च करायला आम्हाला निधी उपलब्ध होतो. याच योजनेतून एकूण 242 कोटी मंजूर झाले असून जळगाव जिल्ह्याला 142 कोट तर 60 कोटी सावदा विभागाला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत.आणि त्यामधूनच आम्ही आज चिंचाटी, सावखेडा बुद्रुक या उपकेंद्राचे या ठिकाणी भूमिपूजन केले जात आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार शिरीष चौधरी, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परीषद सदस्य सुरेखा पाटील, पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोले, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, जिल्हा परीषद सदस्य सरबाज तडवी, सावखेडा बु.॥ सरपंच लता पाटील, लोहारा सरपंच लियाकत जमादार, छोटू तडवी, ज्ञानेश्वर महाजन, प्रतिभा मोरे, मानसी पवार, माजी नगराध्यक्ष हरीष गगवानी, सावखेडा खुद, सरपंच बेबाबाई बखाल, महावितरण मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता मो.फारुख शेख, कार्यकारी अभियंता सावदा गोरक्षनाथ सपकाळे, कार्यकारी अभियंता स्थापत्य जळगाव विभाग अनिरुद्ध नाईकवाडे, सहाय्यक अभियंता खिरोदा सागर डोळे, ज्ञानेश्वर कोळी, यावल तहसीलदार महेश पवार, रावेरचे नायब तहसीलदार संजय तायडे, मंडळाधिकारी जे.बी.बंगाळे, तलाठी निलेश चौधरी, खिरोद्याचे माजी सरपंच गीता चौधरी, राजू सवणे, अयाज शेख, रुपेश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले, चंद्रकला इंगळे, योगेश पाटील, धनंजय चौधरी, तुकाराम बोरोले, विलास ताठे, ज्ञानेश्वर महाजन, बेबाबाई महाजन, शबाना तडवी, हरीष जगवानी सव महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.