शहादा। शहरात सलग चौथ्यांदा रहदारीचे नियम तोडणार्या 35 दुचाकी स्वारांवर पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. शहरात डायमंड कार्नर, नगकपालीका, मनोरंजन सिनेमा मेनरोड चौफुली सह अनेक भागात एकेरी वाहतुक असतांनाही दुचाकीस्वाकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने बर्यांचदा रहदारीची कोंडी होते. त्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यासाठी गेल्या चार दिवसापासुन पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत याचे मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पोलीसांनी रहदारीचे नियम तोडणार्यांविरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
नगरपालीका जवळ राँग साईडने येणार्या वाहनांना अडवुन वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आले. पहिल्या दिवसी 50 दुसर्या दिवसी 48 दुचाकीस्वारांवर तर चौथ्या दिवसी 35 दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सलग चौथ्यांदा पोलीसांनी कारवाई केल्याने दुचाकीस्वारांना धडकी भरली आहे. शहरात दुचाकीस्वारांनी नियम धाब्यावर ठेऊन दुचाकी चालवत होते. या कारवाईमुळे आतातरी दुचाकीस्वार नियमाने दुचाकी चालवतील असे बोलले जात आहे.