नियाज अली फाऊंडेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

0

नागरीकत्व दुरूस्ती विधेयक, एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी

जळगाव – केंद्र सरकारने नागरीकत्य दुरूस्ती विधेयक (कॅब) हे मंत्री मंडळात मंजूरी दिलेली तसेच एनआरसी सुध्दा आसाम मध्ये लावण्यात आलेले असून सरकार संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे. हे दोन्ही कायदे फक्त मुस्लिम विरोधी दोन्ही कायदे त्वरीत रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी सै.नियाज अली भैय्या मल्टीपर्पज फाऊंडेशन यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तसेच मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

आपल्या भारताचे संविधान सर्व समावेशक असून त्यात प्रत्येक जाती धर्म पंथाला समान न्याय व हक्क बहाल करण्यात आलेला असून कोणत्याही जाती देष, वर्ण देष करून कोणावरही कोणीही अन्याय करू शकत नाही. असे असतांना सुध्दा केंद्र सरकाने नागरिकत्व दुरूस्ती विधेयक व एनआरसी हे दोन्ही कायदे मुस्लिम विरोधी असून मुस्लिम समाजाला लक्ष करून बनविण्यात आलेले आहे, हे कायदे भारतीय संविधानाच्या विरोधात असून यामुळे आपल्या देशात राहणार्‍या मुस्लिम बांधवामध्ये भितीचे वातावरण आहे. या कायद्याने मुस्लिम हे विदेशी ठरविले जातील, असे निवेदनात म्हटले आहे.

घोषणांनी परिसर दणाणला

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक व एनआरसी या दोन्ही कायद्यांचा निषेध म्हणून नियाज अली फाऊंडेशनतर्फे सोमवारी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ावेळी वापस लो वापस लो एनआरसी बिल वापस लो, वापस लो वापस लो कॅब बील वापस लो, होश मे आओ केंद्र सरकार होश मे आओ, नही चलेगी मनमानी नही चलेगी, या घोषणांनी परिसर दणाणला होता. याप्रसंगी सै. अयाज अली नियाज अली, राहूल चौधरी, हाजी जाफर, शेख जमी, शेख मुस्तकीम, हमीद खान, अकबर शाह, जुबेर रंगरेज, शेख जाकीर, शेख सज्जाद, शेख तौसिफ, अब्दुल रज्जाक, मो. खान जावेद अहमद, शेख शाहीद, शेख सलमान, आसीफ नुरी, वसीम अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.