सिंदखेड राजा : नियोजित घटीकेवर लागणारे लग्न तसे दुर्मीळ मात्र लग्न मुहूर्त हुकल्यानंतर तब्बल पाच तास उलटूनही नवरदेव मंडपात येत नसल्याचे पाहून संतप्त वधू कडील मंडळींनी नियोजित वधूचा विवाह दुसर्याशी उरकून टाकला. सोशल मिडीयावरील या विवाहाची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. आता नवरदेव येईल, मग नवरदेव येईल या प्रतिक्षेत असलेल्या वर्हाडी मंडळींच्या संतापाचा कडेलोट झाल्यानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर वर पक्षाला मात्र रीकाम्या नामुष्कीने परतण्याची वेळ आली.
या लग्नाची म्हणून राज्यात चर्चा
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील ही घटना आहे. 22 एप्रिल रोजी विवाह संपन्न होणार होता. दुपारी साडेतीन वाजता लग्नाचा मुहुर्त होता. मात्र, वरमंडळी उशिरा आले. त्यामुळे विवाहापूर्वींच्या सर्वच विधींना उशिर होत गेला. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर, वरात निघताच नवरदेवाचे मित्र पुढे आले. वेळेकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याने चार ते पाच तासांपेक्षा अधिक वेळ सर्वच खोळंबून बसले. यामुळे वधू पक्षाच्या संयमाचा कडेलोट झाला.
कंटाळलेल्या वधूने अखेर लग्न मंडपातून एकाची केली निवड
दोन्ही पक्षात वादावाद झाली. अखेर हा विवाहच करायचा नसल्याची भूमिका घेत वधू पक्षाने वर पक्षाला काढता पाय घेण्यास सांगितले. नवरदेव आपल्या मित्रांसमवेत पुन्हा घरी एकटाच परतला मात्र वधू पक्षाने दुसर्या तरुणाची निवड केली. नवरीनेही त्याला पसंत केले आणि त्याच मंडपात नवरीचा विवाह नियोजित नवरदेवाऐवजी ऐनवेळी दुसर्याच तरुणाशी करण्यात आला. त्यामुळे या विवाहाची सध्या राज्यात चर्चा रंगत आहे.