यावल। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी खोटा पुरावा जोडून लाभ घेतला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला. दहिगाव येथील एका लाभार्थ्याने वयाचा खोटा पुरावा सादर करून आतापर्यंत 29 हजार 400 रूपयांची रक्कम हडप केली आहे.
ही रक्कम संबंधितास नोटीस बजावून वसूल करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी विठ्ठल पंडीत लोहार यांनी वयाचा खोटा पुरावा जोडून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा ऑगस्ट 2012पासून लाभ घेतला. त्यांना दरमहा 600 रूपये अनुदान मिळत होते. मात्र, वयाचा पुरावा खोटा असल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास येताच तहसीलदार कुंदन हिरे यांनी संबंधिताला 29 हजार 40 रूपये जमा करण्याचे आदेश दिले.