निराधार योजनेसाठी लाभार्थ्यांना करावे लागणार ऑनलाइन अर्ज

0

यावल। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी यापुढे लाभार्थ्यांना महाऑनलाइनकडे अर्ज सादर करावे लागतील. राज्याच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे गरजूंना विनाकारण पुढार्‍यांच्या मागे-पुढे फिरावे लागणार नाही. नियमानुसार लाभ मिळेल.

शासन निराधार लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पाच योजना राबवते. यापूर्वी योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी योजना विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागत होता. आता आता ही प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यानुसार कुंदन हिरे यांनी एप्रिलपासून सर्व पाचही योजनेच्या लाभांसाठी गरजू पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी महाऑनलाइनमार्फत संगणकीय प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीमुळे योजना अधिक पारदर्शक सुलभ होईल, अशी माहिती दिली. नवीन लाभार्थ्यास ऑनलाइन अर्ज केल्यावर त्यांच्या नोंदणीची प्रत सोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील. यानंतर समिती लाभार्थी निवडीचा निर्णय घेईल.