तळेगाव – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अमरनाथ वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाघमोडे यांनी बुधवारी (दि. 13) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. अमरनाथ वाघमोडे यापूर्वी रांजणगाव पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2017 ते जून 2018 या कालावधीत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर मुगुट पाटील यांनी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. पाटील तळेगाव पोलीस ठाण्यात 1 जून 2017 रोजी आले होते. एक वर्ष कार्यरत राहिल्यानंतर त्यांची सासवड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.