रावेर:- तालुक्यातील निरुळ येथे रविवारी रात्री एकच्या सुमारास मातीचे जुन्या घराचे छळ अचानक कोसळून त्या खाली पती-पत्नीसह मुलगा दबून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर लागलीच ग्रामस्थांनी धाव घेतल्याने परीवाराचे प्राण वाचले. निरुळ गावातील रहिवासी असलेल्या राहुल पाटील हे त्यांच्या पत्नी शीतल पाटीलसह त्यांच्या दहा महिन्यांच्या वेदांतसह झोपले असताना रात्री एक वाजेच्या सुमारास घराचे मातीचे छळ तिघांच्या अंगावर कोसळले. या घटनेनंतर जगन्नाथ चौधरी, बंडू पाटील, हिरालाल पाटील व काही ग्रामस्थांनी कोसळलेले छत बाजूला करून उभयंतांना सुखरूप बाहेर काढले.