निरोगी आयुष्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय

0

यावल। आजची तरुण पिढी पाश्‍चिमात्त्यांचे अनुकरण करुन विविध व्यसनांंच्या आहारी जात आहे. धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात आपण हतबल झालो आहोेत. अशातच नियमित व्यायाम करण्यासाठीही आपल्याजवळ पुरेसा वेळ नाही. त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही आजार जडलेला आहे. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आधुनिक साधनांद्वारे व्यायाम केल्यास निरोगी आयुष्य आपणास लाभू शकते, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. भालोद येथील असकर सार्वजनिक व्यायाम शाळा व क्रीडा मंडळातर्फे नवीन व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार जावळे बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक गणेश नेहेते होते. जिल्हा परिषद सदस्या नंदा सपकाळे, रविंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या लता कोळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नरेेंद्र कोल्हे, शशिकांत गाजरे, नारायण चौधरी, अरुण चौधरी, रफिक शेख, मिनल जावळे, नितीन चौधरी, जितू कोळी, प्रदिप कोळी, महेंद्र कोळी, भास्कर पिंपळे, मुरलीधर इंगळेे आदी उपस्थित होते. प्रसंगी व्यायाम शाळेचे अध्यक्ष जाबिर खान यांनी प्रस्तावनेत खा. रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानले. सुत्रसंचालन आरिफ खान यांनी तर आभार डॉ. साबिर खान यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुनाफ खान, सादिक खान, इस्माईल खान, जावेद खान, आसिफ खान यांनी परिश्रम घेतले.