निरोगी जीवनासाठी लसीकरण महत्वाचे

0

जळगाव । जीवनात निरोगी राहण्यासाठी काळजी म्हणून लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. गेल्या २५ वर्षात विविध लस उपलब्ध झाल्यामुळे काही विकार जवळपास नष्ट झाले आहेत, असे रोटरीचे मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.सुनील सुर्यवंशी यांनी प्रतिपादन केले. रोटरी क्लब जळगाव तर्फे सिव्हील हॉस्पीटल मधील नर्सिंग ट्रेनिंग कॉलेज मध्ये झालेल्या ‘रूबेला लसीकरण’ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष नित्यानंद पाटील व प्राचार्या प्रणिता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थीनीस रूबेला लस टोचून केला शुभारंभ
नित्यानंद पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांची सेवा करणार्‍या परिचारिकांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने विशेष शिबीराचे आयोजन केल्याचे मार्गदर्शन करतांना सांगितले. रोटरीच्या यामोफत शिबीराच्या उपक्रमाबद्दल प्राचार्या प्रणिता गायकवाड यांनी अभिनंदन करून ऋण व्यक्त केले. डॉ.सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनीस रूबेला लस टोचून शुभारंभ करण्यात आला. १०७ प्रशिक्षणार्थी परिचारिकांना रूबेला लस देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.सुनिता लांडगे यांनी तर आभार प्रा.अनिता भालेराव यांनी मानले.