जळगाव । दैनदिन जीवनातील धावपळ, कामाच्या ठिकाणी व घरी असणारा ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, याबरोबर बैठी जीवनशैली, हालचालींचा अभाव ही कारणे मनस्वास्थ बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरतात. यावर एकमेव उपया म्हणजे व्यायाम. कोणताही व्यायाम हा ताण कमी करण्यास नक्की मदत करतो. प्रत्येक व्यायाम प्रकारात शरीर स्वस्थ होण्यास मदत होते. परंतु काही व्यायामात संतुलित मनाला फारसे महत्व दिले जात नाही. योगासने प्राणायम सुदृढ शरीर व सकारात्मक संतुलित मन बनववितात. ध्यान, धारणा, या गोष्टी मनातील नकोसे विचार अथवा भावना दूर सारतात परिणामी स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. ’निरोगी शरीर, निरोगी मन’ ही म्हण ही खरी आहे. योगामुळे निरोगी शरीर आणि दिर्घ आयुष्य लाभण्यास मदत होते. निरोगी व संतुलीत आरोग्यासाठी बुधवारी 21 रोजी जागतिक योग दिनानिमित्त शहरातील शासकीय, अशासकीय कार्यालये, संस्था, संघटनांतर्फे योग करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुलात योगदिन
भारत सरकारचे आयुष मंत्रालय, क्रीडा व युवक सेवा संचालनाल, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी खासदार ए.टी.नाना पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे उपस्थित होते. शहरातील 30 शाळेतील सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या शिष्टाचारानुसार उपस्थितांनी योगासने केली. यावेळी उपशिक्षणाधिकारी सर्व एस.टी.वराडे, डी.डी.देवांग, सिध्दार्थ नेतकर, पतंजली योग समितीचे राजेंद्र महाले, हेमंत चौधरी, समाधान बरकले, जयश्री पाटील, महेंद्र शर्मा, प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्राच्या मनिषा दिदी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
दिव्यांगांनी केला योगा
संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशी संस्था, दिव्य अपंग बचतगट, जय सदगुरु वस्ती स्तर संघ, राष्ट्रसेवा फाऊंडेशन, यमुना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा केला. दिव्यांग बांधवांनी योगासने केली. यावेळी आमदार राजुमामा भोळे, प्रकल्प अधिकारी गायत्री पाटील, कविता जाधव, भुषण बाढे, गणेश पाटील, किशोर नवे, आशा पाटील, मनिषा दळवी, संगिता प्रजापत, संजय कासार, दल्लु भदाणे, राजेंद्र वाणी, जितू पाटील, प्रविण पाटील, कल्पना पाटील, सिमा खैरनार, संगिता पाटील, आरती पाटील, अमोल विसपूते, जितेंद्र पाटील, भटु जोशी, चेतन जाधव, शेख गफूर, जयंत उज्जैनकर, मोहीनी चौधरी, प्रकाश सोनगिरे, प्रविण भोई, सचिन खैरनार, शांताराम एकशिंगे आदी उपस्थित होते.
युवाशक्तीतर्फे तिसरा योगदिवस साजरा
2015 यावर्षी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषीत करण्यात आला. याच पार्श्वभूमिवर मागील 2 वर्षापासून काव्यरत्नावली चौकात योग दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदाचे हे तृतीय वर्ष होते. ज्ञानयोग वर्गाच्या संचालिका हेतल पिपरीया यांनी उपस्थित योग साधकांना ॐ काराचे महत्व, विविध प्रकारचे योगासने, प्राणायाम, सूर्य नमस्कार यांची माहिती देत विविध आसने करुन घेतली. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खासदार ए.टी.नाना पाटील, जैन इरिगेशनचे फरुख शेख, नगरसेवक नितिन बरडे, नगरसेवक रविंद्र पाटील, नगरसेविका ज्योती चव्हाण, आशा फाऊंडेशन गिरीष कुळकर्णी, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया, अमित जगताप, हर्षित पिपरीया, दिशा फाऊंडेशनचे विनोद ढगे, अतुल निकम मान्यवर उपस्थित होते. खासदार ए.टी.पाटील यांनी मंचावरुन योगासन करत पंतप्रधान योगसाधना करत असल्यानेच 18 ते 20 तास काम करु शकत असल्याचे सांगितले.
बालकांनी योगनृत्य व संगीताचे केले सादरीकरण
कार्यक्रमात टेरिफिक डान्स अकॅडमीच्या बालकांनी ’योगा डान्स’, ज्ञानयोग वर्गच्या योगसाधकांनी ‘आदि योगी’ या गाण्यावर संगितमयी योग केला. 5 वर्षीय ज्ञान हर्षित पिपरिया यान योगाचे प्रात्यक्षिके करुन दाखवत उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक गिरिष कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन अमित जगता यांनी केले. कार्यक्रम युवाशक्ती फाऊंडेशन, भंवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन, ज्ञानयोग वर्ग, जैन स्पोर्टस अकॅडमी, वैदिक यात्रा परिवार, हेल्दी यु वेलनेस योगा सेंटर, आशा फाऊंडेशन, दिशा फाऊंडेशन, गिरीजाशंकर फाऊंडशेन, युवा विकास फाऊंडेशन, जुने जळगाव मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, एकता मित्र मंडळ, आदर्श मल्टिपर्पज फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग पीठ, टेरिफिक डान्स अकॅडमी, शिव गंध ढोल-ताशा पथक, आयोग्यम योगा क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी मंजित जांगीड, राहूल चव्हाण, नवल गोपाल, विनोद सैनी, मितेष गुजर, पियुष दोषी, तेजस दुसाने, हरिष चौबे, सेनाली राठी, चंदन जावळे, परेश शिंनकर, राकेश कुंठे, विनय सोनार, ललित लोहार, लिना बशिर, सिमा बागुल, जयश्री पाटील, भूमी पिपरीया, हर्षित पिपरीया, वृश्चांक ढाके, दिपक नेवे यांचे सहकार्य लाभले.
पोलीस मुख्यालयात कार्यक्रम
बुधवारी 21 रोजी सर्वत्र जागतिक योग दिनानिमित्त योगा करण्यात आला. शहरातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानात सर्व पोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी यांनी योगा केला. यावेळी जिल्हाअधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, प्रांताधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
गोदावरीत योग प्राणायाम
येथील गोदावरी फाऊंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्राणायाम शिबीराद्वारे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमीत्त गोदावरी फाऊंडेशनच्या सीबीएसई स्कुल, वैद्यकीय महाविद्यालय, भुसावळ आणि सावदा सीबीएसई स्कुल, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरेपी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, होमीओपॅथी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय याठिकाणी योग-शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापकांनीही योगासने केली. गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.व्ही.जी.अराजपुरे, उपप्राचार्य प्रविण फालक, प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, डॉ.एन.एस. आर्विकर, प्रमोद भिरूड, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ.एस.एम.पाटील, प्राचार्या निलीमा चौधरी, अनघा पाटील, एनएसआययुचे अध्यक्ष देवेंद्र मराठे आदींनी योग शिबीरांमध्ये सहभाग घेतला.
केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे जिजामाता विद्यालयात कार्यक्रम
तिसर्या जागतिक योग दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हरिविठ्ठल नगर येथील जिजामाता विद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 275 विद्यार्थी आणि 18 शिक्षक उपस्थित होते. योगदिनाचे महत्व आणि विद्यार्थी दशेत योगाचे फायदे विषद करत जळगावमधील योगगुरु खेमराज खडके यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमित योगा करण्याची शपथ घेतली. यात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी पूरक हालचाली, सूर्यनमस्कारासह हसत – खेळत योग केला. कार्यक्रमच्या समारोप प्रसंगी केशवस्मृती प्रतिष्ठानचे सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ. विवेक जोशी उपस्थित होते. यावेळी केशवस्मृतीचे जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन आणि योगाचे विद्यार्थी देवेंद्र काळे उपस्थित होते.
मिल्लत हायस्कूल
मेहरुण येथील मिल्लत हायस्कूलमध्ये जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. शाळेचे क्रीडाप्रमुख ताजोद्दिन शेख यांनी योगावर मार्गदर्शन केले. तसेच क्रीडाशिक्षक सैयद मुख्तार यांनी विद्यार्थ्यांकडून योगाचे धडे दिले. मुख्याध्यापक मुश्ताक शेख, पर्यवेक्षक अब्दुल कय्युम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रोगेसिव्ह इंग्लिश मिडीयम
विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तिसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरक हालचालीनंतर दंडास्थितीतील ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन इत्यादी आसने घेण्यात आली. तर प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भामरी प्राणायाम घेण्यात आले. प्रार्थना व ओंकाराने कार्यक्रमाची सांगण्यात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्रध्दा दुसाने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर व संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. यावेळी सविता बाविस्कर यांनी योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
सोहंम योग विद्या
सोहंम योगविद्या केंद्रातर्फे तिसर्या आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त योगप्रात्याक्षिकाद्वारे योगदिन साजरा करण्यात आला. दीपस्तंभ फाऊंडेशनच्या, मनोबल केंद्रातील 80 प्रज्ञाचक्षु व दिव्यांग मुलांनी आसन व प्रात्याक्षीक करुन सहभाग घेतला. कार्यक्रमाचे दिवप्रज्वलन दुर्जा, संगकारा, पांडुरंग ह्या दिव्यांग व प्रज्ञाचक्षुंनी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी (माजी उपमहापौर) शिक्षका भारतीताई सोनवणे, विलासजी इंगळे उपस्थित होते. संचालिका हेमांगिनी सोनवणे त्यांनी प्रास्तविक व कार्यक्रमाचे संचलन केले. त्या प्रसंगी सोहंम योगविद्या केंद्राचे योगशिक्षक अरविंद सापकर, मृदुला कुलकर्णी, खेमराज खडके, दीपस्तंभ व मनोबलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.
शहरात अवतरले योग गुरू; योग फेरीतून जनजागृती
विश्व योग दिन आयोजन समितीतर्फे 21 जून रोजी दुपारी 4 वाजता योगफेरी काढण्यात आली होती. खान्देश सेंट्रल, नेहरू चौक,टॅावर चौक, विघ्नहर्ता गणपती मंदिर, विसनजी नगर, कोर्ट चौक, शिवतीर्थ या शहराच्या मुख्य मार्गावरून योगफेरी निघाली होती. आरोग्य भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, केशवस्मुती प्रतिष्ठान, राष्ट्रीय संस्कार केंद्र, सोहम डिपारमेंट ऑफ योग विभाग, विश्व हिंदू परिषद, पतंजली योग समिती, भारतीय योग विद्याधाम, सोहम योग विद्या केंद्र, योग विद्याधाम, गायत्री परिवार, ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय, संजीवनी विद्या समिती, आनंदतीर्थ गो सेवा संस्थान आदी संस्था, शाळा, महाविद्यालये, संघटना योगे फेरीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध संदेश देणारे योगाचे फलक नागरिकांचे आकर्षण बनले होते.
भगीरथ शाळेत योगा
भगीरथ शाळेत आंतराष्ट्रीय योग दिनानिम्मिताने योग सराव प्रशिक्षण उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आशा मधुकर चौधरी, उपमुख्याध्यापिका नेहा जोशी, पर्यवेशक किशोर राजे, प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक श्याम ठाकरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मु.जे महाविद्यालयाच्या योग केंद्रातील चेतना जाधव, डॉ पाटील,व त्याचे सहकारी योग मार्गदर्शन केले. विविध आश्नाची माहिती यावेळी देण्यात आली. आपण व आपले आरोग्य, योग व आरोग्य, दैनदिन जीवनात योगाचा फायदा ध्यान, ओंकार साधना यासह विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण दिले.
उमवीत योग मार्गदर्शन केंद्र
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमिवर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी भवनात योग मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, डॉ. गिरीधर करजगांवकर, प्रा.आरती गोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच योग अभ्यासक डॉ.गिरीधर करजगाांवकर यांचे व्याख्यान आणि योग प्रात्यक्षिक अशा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. 20 जून रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचार्यांच्या कुटुंबियांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले. 21 रोजी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी योग प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, कर्नल दिलीप पांडे, कर्नल अॅलेक्स् जोसेफ यांची प्रमुख उपस्थिती होती. योग तज्ज्ञ डॉ.गिरीधर करजगांवकर आणि प्रा.आरती गोरे यांचे योग विषयक व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु होते. सुत्रसंचालन डॉ.दिनेश पाटील व राजेश पाटील यांनी केले.
जे.के.इग्लिश स्कूल
साई नगर, रायसोनी नगर स्थीत एज्युकेशन प्ले गृप व जे.के. इंग्लिश सकूल येथे शिक्षक, विद्यार्थ्यांनी योग दिनानिमित्त योगासने केली. संचालिका ज्योती श्रीवास्तव यांनी योगाचे महत्व व फायदे उपस्थितांना सांगितले. यशस्वीतेसाठी वनिता पाटील, मेघा कुलकर्णी, उज्ज्वल चौधरी, रुपाली पाटील, दिपाली जयस्वाल, पूजा श्रीवास्तव यांचे सहकार्य लाभले.