निरोगी, सुदृढ समाज निर्मितीसाठी व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

0

जळगाव। आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी व सुधृढ समाज निर्मितीसाठी व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील यांनी असे प्रतिपादन केले. पाळधी येथे भव्य आरोग्य शिबिराप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ तर प्रमुख अतीथी म्हणून जि.प.चेआरोग्य सभापती दिलीप पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.आर.पाटील,पं.स.सभापती सचिन पवार,उपसभापती प्रेमराज पाटील व जि.प.सदस्य.पवन सोनवणे ,जि,प.सदस्य प्रतापराव पाटील उपस्थित होते.

आरोग्यामित्रांचा सन्मान पत्र देऊन सत्कार
पाळधी तालुका धरणगाव येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.मुलांची शाळा येथे भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शिवसेना,युवसेना जळगाव व धरणगाव तालुक्यामार्फत आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिबिरात सहभाग नोंदवलेल्या सर्व वैद्यकीय अधिकार्‍याचा,स्वयंसेवी संस्था तसेच जिल्यातील आरोग्यामित्रांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

220 व्यक्तिंना मोफत हेल्मेट वाटप
शिबिरात सुमारे 2000 वर रुग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी करण्यात आली. सुमारे 250 ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आली. 443 अपघात विमा नोंदणी करण्यात आली तर रस्ता सुरक्षा अभयान अंतर्गत हेल्मेट नोंदणी करण्यात येऊन सुमारे 220 व्यक्तिंना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.या वेळी अंतररुग्न व शस्त्रक्रियेसाठी 282 रुग्ण आढळून आले.ना.यांच्या वाढदिवसानिमित्त 23 मे,27 मे,29 मे व 30 मे रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासनी शिबीर झाले होते त्यात आढडून आलेल्या 101 रुग्णांच्या मोतीबिंदू यशस्वी शस्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव येथे करण्यात आल्या.या सर्व रुग्णांना ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,नाना सोनवणे, ईश्वर सपकाळे,राधेश्याम पाटील, नरेंद्र सपकाळे, मुकुंद नन्नवरे,तुषार महाजन, गणेश सोनवणे,शोभाताई चौधरी,ज्योती शिवदे,सुनिता भालेराव,कृ.उ.बा संचालक् मुरलीधर पाटील ,तालुका वैदयकीय अधिकारी डॉ.संजय सोनवणे,डॉ.शिवराज पाटील,डॉ.शीतल पाटील,डॉ.गौतम नन्नवरे,ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज,युवसेनेचे आबा महाजन,विक्की पाटील,गोकुळ पाटील,प्रमोद परदेशी,पिंटू कोळी,चंदू इगळे उपस्थित होते.

136 जणांनी केले रक्तदान
या शिबिरात भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले.रक्तदान नोंदणी करीता 280 शिवसेना,शिक्षक सेना,युवसेना व मतदार संघातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला पैकी पात्र 93 व्यक्तींनी रक्तदान केले. काल धरणगाव येथे झालेल्या शिबिरात 43 रक्तदात्यांनी असे ऐकून 136 व्यक्तींनी प्रचंड प्रतिसाद देत रक्तदान केले. दिव्यांग (अपंग) असलेल्या 132 रुगनांनी सहभाग नोंदवून साहित्यसाठी मोजमाप घेण्यात आले. यातील पात्र व्यक्तींना पुढील महिन्यात साहित्य वाटप करण्यात येणार आहे.