मरकळ विद्यालयातील लिपिक तुळशीराम भुसे झाले उतराई
शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) येथील केशवराज शिक्षण संस्थेच्या नवीन माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक तुळशीराम श्रीहरी भुसे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ नुकताच पार पडला. भुसे यांनी याच समारंभात शिक्षण संस्थेला 25 हजार 555 रुपयांची आर्थिक मदत करून संस्थेप्रति असलेली आस्था दाखवून दिली. या संस्थेत त्यांनी तब्बल 31 वर्ष 6 महिने सेवा बजावली. वयाच्या 58 व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. मरकळला 1985 मध्ये केशवराज शिक्षण संस्थेच्या नवीन माध्यमिक विद्यालयाची सुरुवात झाली होती. विद्यालयास सुरुवातीला मान्यता व अनुदान नसतानाही भुसे यांनी तुटपुंज्या मानधनावर काम केले. त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्रा. वसंत नुलकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल लोखंडे, सरपंच स्वाती लोखंडे, उपसरपंच उमेश वर्पे, उत्तम जगताप, माजी उपसरपंच रोहिदास लोखंडे, सुरेश लोखंडे, प्रा. नादिरा शाह, सुरेश घुले, शंकर सुतार, दशरथ लोखंडे, मुख्याध्यापक पिंगळे, लाला लोखंडे, सचिन लोखंडे, सुभाष खांदवे, हनुमंत लोखंडे, गणेश लोखंडे उपस्थित होते.