जळगाव- शहरात मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी निविदेसह 11 विषयांवर चर्चा करण्यासाठी मनपा स्थायी समितीची सभा दि.11 रोजी सकाळी 11 वाजता सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.शहरात मोकाट श्वानांचा धुमाकुळ सुरु आहे.निर्बिजीकरणासाठी सात ते आठ वेळा निविदा प्रक्रीया राबवून देखील त्यास प्रतिसाद मिळाला नाही.फेर निविदा काढल्यानंतर अमरावतीच्या मे. लक्ष्मी इन्स्टिट्यूट आफ वेल्फेअर या एजन्सीची ऐकमेव निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांनाच हे काम देण्याबाबत प्रशासनाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे. 1 हजार 25 रुपये प्रती श्वान या दराने या एजन्सीला काम देण्यास मंजुरीसह दि.4 सप्टेंबर रोजी सभेत घनकचरा प्रकल्पावरील साचलेल्या कचर्याचे बायोमायनिंग करणे व नविन घनकचरा प्रकल्प उभारणीचे तहकूब ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांवर देखील चर्चा होणार आहे.