नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया प्रकरणाला 5 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त शनिवारी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थिती लावली. मात्र, त्यांनी महिलांवर बोलणे सोडून सरकारने साध्य केलेल्या माइलस्टोनवर बोलून राजकीय भाषण सुरू केल्याने कार्यक्रमात भाजपशी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यांना शांत करण्यासाठी निर्भयाच्या आई जागेवरून उठल्या. तरीही कार्यकर्ते शांत होत नसल्याचे पाहता केजरीवालांनी कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल सभा सोडून गेल्यानंतर भाजप खासदार आणि भोजपुरी कलाकार मनोज तिवारींनी उपस्थिती लावली.