निर्भया प्रकरण: ज्या आरोपींचे पर्याय संपले त्यांना फाशी द्या: सरकारने कोर्टात मांडली बाजू !

0

नवी दिल्ली: निर्भया प्रकरणी दिल्ली हायकोर्टात रविवारी पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. आरोपी काहीतरी कारणे पुढे करून फाशीची शिक्षा लांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. न्याय मिळण्यासाठी उशीर होता कामा नये, त्यामुळे ज्यांचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत त्यांना एक-एक करुन फाशी द्यायला हरकत नाही. त्यासाठी सर्वांची फाशीची शिक्षा लांबवण्यात येऊ नये असे तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले.

“कायद्यानुसार फाशीच्या १४ दिवस आगोदर दोषींना नोटीस द्यावी लागते. या प्रकरणात नोटीस दिल्यानंतर १३ व्या दिवशी एका दोषी कोर्टात पुनर्विचारासाठी याचिका दाखल करतो. हे सर्व दोषी मिळून फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यासाठी काम करीत आहेत. सत्र न्यायालयाने दिलेला फाशी रोखण्याचा आदेश थांबवायला हवा. कारण, देशातील प्रत्येक गुन्हेगार न्यायालयीन प्रणालीला हारवण्याचा आनंद घेत आहेत असे तुषार मेहता यांनी सांगितले. दुसरीकडे दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी चारही दोषींपैकी एक गरीब कुटुंबातून एक ग्रामीण भागातून तर एक दलित कुटुंबातील आहे. त्यामुळे कायद्यातील अस्पष्टतेची मोठी किंमत त्यांना चुकवायला लागता कामा नये अशी बाजू मांडली.