नवी दिल्ली : निर्भया बलात्कार करून हत्ये प्रकरणी अक्षय कुमार सिंहची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाने अक्षय कुमार सिंहने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. अक्षय कुमार सिंह याने आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
याआधी या प्रकरणातील विनय, पवन आणि मुकेश या दोषींनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र कोर्टाने त्या सर्व याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने फाशीवर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते.