नवी दिल्ली: २०१२ मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने २ मार्चला फेटाळून लावली होती. त्यानंतर ३ मार्चला फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. आरोपी पवन गुप्ताने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. ती याचिका आज बुधवारी राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्यामुळे चारही दोषींना फाशीवर शिक्कामोर्बत झाली आहे. मात्र चौथे डेथ वॉरंट न्यायालय कधी जारी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत निर्भया प्रकरणातील चार दोषींच्या ३ मार्चला होणाऱ्या फाशी शिक्षेला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर दोषी पवन गुप्ता यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती.