निर्भायातील आरोपी मुकेशच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणीस तयार !

0

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना लवकरच फाशी दिली जाणार आहे. दोषींपैकी एक असलेला मुकेशची शेवटची याचिका सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. दोषी मुकेश कुमार सिंह यांनी राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.

मुकेशने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरलेल्या मुकेशच्या वकिलांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यासमोर याचिका सुनावणीसाठी पाठवण्यास सांगितले. निर्भया प्रकरणात दोषी मुकेशच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही. निर्भया प्रकरणात फाशी होऊ नये म्हणून दोषींकडून रोज नवीन युक्ता लढविल्या जात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर आता दोषी ठरलेला मुकेश सिंह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाला आहे. मुकेश यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देत न्यायालयीन आढावा घेण्याची मागणी केली.