निर्मलमध्ये बरसल्या स्वरगंधच्या धारा

0

पाचोरा । येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘निर्मल स्वरगंध’ या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गायन वादनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी कायदे, तुकडे, मुखडे व आकर्षक तिहाई सादर करुन रसिकांची मने जिंकली. रागभिमपलास, धु्रपद, बंदीश आणि तराणा सादर करुन विद्यार्थी कलावंतांनी स्वरगंधाची अनुभूती दिली.