निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांचा हरीनामाचा गजर!

0

पाचोरा। निर्मल इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेत ‘हरी नामाचा गजर ’! आषाढी एकादशीचे औचित्य साधून निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा व पूर्व प्राथमिक विभाग शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने माहेश्‍वरी मंगल कार्यालय, शेंदुर्णी येथे हरी नामाचा गजर हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये गजर, अभंग, लेझिम प्रात्यक्षिक, आरती यांचा समावेश होता. या प्रसंगी शेंदुर्णी येथील पालकवर्ग व भाविक मोठ्या संख्येेने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सचिन जगताप, गुंजन जगताप, नर्मदा पांडे, शीतल जावरे यांनी परीश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी व प्राचार्य डॉ. भगवान सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन चांदणी दुसेजा हिने तर आभार प्रिया परदेशीहिने व्यक्त केले.

गो.से. हायस्कुलतर्फे विठ्ठल रूख्मीनींचा पेहराव
श्री. गो.से. हायस्कुल येथुन विठ्ठल रुखमाईचे पालखी पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी – विद्यार्थीनींनी विठ्ठल रुख्मीनींचा पेहराव करुन शहरात मिरवणुक काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिंडी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पध्दतीने रिंगण करुन विठ्ठल नामाची गिते, भजने गायली. टाळ व मृदृंग यांच्या संगतिने विठ्ठल -रुखमाईच्या जयघोषाने संपुर्ण परिसर भक्तीमय सागरात मंत्रमुग्ध झाला होता. दिंडीच्या समारोप प्रसंगी पाचोरा पिपल्स बँकेचे चेअरमन व संचालक यांनी विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आषाढीनिमित्त एरंडोलला कार्यक्रम
एरंडोल । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्या मंदिर व गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कुल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते पालखी पूजन करण्यात आले. शालेय समितीचे सचिव सचिन विसपुते अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यार्थ्यांची शालेय दिंडी काढण्यात आली. अमळनेर दरवाजापासून दिंडीची सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी नेण्यात आली. दिंडीत सहभागी झालेले विविध पोशाखातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, मुख्याध्यापिका माधुरी तायडे यांचेसह सर्व शिक्षक उपस्थित होते. पालखी पाहण्यासाठी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.