धुळे । महाराष्ट्र विधी मंडळ व शासनाने गठीत केलेल्या 23 आमदारांची पंचायतराज समितीचा दौरा धुळे जिल्ह्यात दि. 5 ते 7 जुलै रोजी येत आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणाची धावपळ उडत असून सर्व शासकीय विभागाच्या यंत्रणा कामाला लागल्याची विश्वसनिय माहिती सूत्रांकडून कडून प्राप्त झाली आहे. पंचायतराज समिती ही जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयाचे दप्तर, तपासणी करणार असून त्यात शासनाकड़ुन आलेला निधी विकास कामासाठी खर्च केल्याची तपासणी करण्यात येणार आहे.गावातील स्वच्छता, शौचालय, साफसफाई, शालेय पोषण आहार, बांधकामे, प्राथमिक आरोगय केंद्र, ग्रामीण रुगणालयाची पाहणी करण्यात येणार आहे. चौकशी समितीच्या पाहणीत गंभीर बाब आढळल्यास तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान या काळात कर्मचार्याना रजा मिळणार नसल्याची सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आली आहे.
निलंबनाची होईल कारवाई
पंचायत राज समितीच्या पाहणी दौर्याच्या कालावधीत कर्मचार्यांना रजा घेता येणार नसल्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत दरम्यान सर्व तपासणी केल्यानंतर समाधान वाटले नाही किंवा गंभीर बाबी निदर्शनास आल्यास कर्मचार्यांना जागेवरच निलंबित करण्याचा आदेश शासनाने या समितीला दिलेला आहे त्यामुळे कर्मचारी व अधिकार्यांचे धाबे दणाणले असून एकच धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत यात जिल्हा परिषद व पंचायत समिती चे अधिकारी व कर्मचारी व ग्रामपंचायत विभाग. आरोग्य विभाग. शिक्षण विभाग विविध खात्यातील कर्मचारी अधिकारी कामाला लागले असुन कार्यालयातील साफ सफाई करून दप्तर व रेकॉर्ड़ पुर्ण करीत आहे दप्तराच्या वेगवेगळ्या फाईल तयार करीत आहे ही समिती कधी कुठे भेट देवु शकते व दप्तर व इतर तपासणी करु शकते यामुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आहे त्या परिस्थितीत, अधिकारी व कर्मचारी यासह पदाधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात कामास गती देतांना दिसताहेत.
23 आमदारांची समिती
महाराष्ट्र राज्य विधीमंड़ळ व शासनाने 23 आमदारांची पंचायत राज समिती गठीत केलेली आहे. यासमितीत आ.प्रकाश भारसाकळे,आ.विकास कुंभारे,आ.आर.टी. देशमुख, आ.समीर कुमावत,आ.कुषणा गजबे,आ.अनिल बाबर,आ.हेमंत पाटील,आ.अमित झनक,आ.सुरेश लाड़,आ.अनिल तटकरे,आ.रामहरी रुपनकर,आ.भिमराव तापकीर,आ.उनमेष पाटील,आ.राजेन्द्र नजरधने,आ.रमेश बुंदिले,आ.भरत गोगावले,आ.राजाभाऊंची वाजे,आ.बसवराज पाटील,आ.राहुल मोटेलचा,आ.दिपक चव्हाण, आ. अनिल गोटे,आ.चंद्रकात रघुवंशी,आ.अॅड़.के.सी पाड़वी आदींचा समावेश आहे.तसेच समितीत सचिवालयाचे उपसचिव,दोन कक्षा अधिकारी,कार्यकारी समितीचे स्वीय सहाय्यक,चार कर्मचारी व चार प्रतिवेधक यादीचा समावेश आहे.
पदाधिकार्यांसोबत चर्चा करणार
दि. 5 रोजी जि.प.मध्ये विविध बैठका व मुख्य कार्यकारी अधिकारी व पदाधिकार्यासोबत चर्चा, दि.6 व 7 रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपुर, साक्री, शिदखेड़ा,धुळे पंचायत समिती प्राथमिक आरोग्य केंद्र,जिल्हा परिषद शाळा,ग्रामपंचायतींना समितीचे सदस्य भेटी देतील. तर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी व विविध खाते प्रमुखाची यावेळी चर्चा करतील. समितीच्या दौर्यामुळे कर्मचार्यांमध्ये धावपळ सुरू झाली असुन ग्रामपंचायत विभाग. आरोग्य विभाग. शिक्षण विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी व अधिकारी कामाला लागले आहेत.