निलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले; हार्दिकच्या वडिलांची माहिती

0

बडोदा : कॉफी विथ करणच्या शोमध्ये महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्याला बीसीसीआयने निलंबित केले. हार्दिकच्या अडचणी काही केल्या कमी होत नाही. निलंबनाच्या कारवाईनंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आहे आणि तो कोणाचे फोनही उचलत नाही, अशी माहिती हार्दिकचे वडील हिमांशु पांड्या यांनी दिली.

‘ऑस्ट्रेलियातून परतल्यापासून त्याने घराबाहेर पाऊल टाकलेले नाही. तो कोणाच्या फोनचेही उत्तर देत नाही. त्याने भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहिला आणि आराम केला. गुजरातमध्ये सणाचे वातावरण आहे. क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे त्याने गेल्या काही वर्षांत कुटुंबीयांसोबत तो सण साजरा करू शकला नव्हता. मात्र, आता तो घरी असूनही सण साजरा करत नाही.”